मालडी भावई मंदिरात २० पासून हरिनाम सप्ताह

मालवण दि प्रतिनिधी
मालडी येथील श्री भावई देवी मंदिर येथे दिनांक २० नोव्हेंबर रोजी सात प्रहाराचा हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.यावेळी अनेक गावातील भजन मंडळ आपली भजन कला सादर करणार आहेत.

या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. सकाळी 10 वाजता भावई देवीची पूजा, अभिषेक, मुकुट,साडी,दागिने परिधान करणे. मंत्रघोष्यात हरिनाम सप्ताह सुरू झाल्यावर देवीची आरती आणि सात प्रहराचा हरिनाम सप्ताह सुरू.
सुहासिनी कडून देवीची खणा नारळाची ओटी भरण्याला सुरुवात.
संध्याकाळी सहा वाजल्यानंतर २० ते २२ भजनी मंडळाचा अभंगाच्या तालावर व टाळ मृदंगाच्या ठेक्यावर भजन कला सादर.
सर्व भजन मंडळांना महाप्रसाद दिला जाणार असून रात्री १२ वाजता दिंडी. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती .
सकाळी १० वाजता मालडी ग्रामस्थांकडून अभंगाच्या तालावर व टाळ मृदंगाच्या ठेक्यावर भजन सादर.
उत्तर पूजा देवालय भोवती पाच प्रदक्षिणा, महाआरती,महाप्रसाद
असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन मालडी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page