तब्बल ३२,२१,९१९/- रक्कमेची झाली वसूली
⚡कणकवली ता.१२-:कणकवली न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री. टी. एच. शेख, सहदिवाणी न्यायाधीश श्री. एम.बी. सोनटक्के व मान्यवर प्रमुख अतिथी यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन्ही न्यायालयातील प्रलंबित ०९ दिवाणी प्रकरणे व ४० फौजदारी खटले तडजोडीने मिटवून निकाली करण्यात आले. दिवाणी व फौजदारीकडील वसुली रक्कम रु. २३,९३,८९९/- राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायत, म.रा.वि. कंपनी यांनी वसुलीसाठी दाखल केलेल्या वादपूर्व प्रकरणापैकी १४१ इतकी प्रकरणे निकाल करुन रक्कम रु. ८,२८,०२०/- इतकी वसुली करण्यात आली कणकवली वकील संघटनेचे सदस्य त्याचप्रमाणे कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पोलीस निरीक्षक कणकवली सचिन हुंदळेकर, पोलीस उपनिरीक्षक वैभववाडी
श्री. पाटील, नायब तहसिलदार श्री. रासम व कणकवली न्यायालयाचे
सहा. अधी. (प्रशासन) श्री.एम. आर. माणगांवकर, लघुलेखक
श्री. तिबीले, लघुलेखक सौ. राणे, , क. लिपीक संतोष पेडणेकर,क. लिपीक श्री. तोरस्कर याचे सहकार्य लाभले.
