खरेदी- विक्री संघ निवडणुकीत विजय आमचाच

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विश्वास;मतदानाचा बजावला हक्क

⚡सावंतवाडी ता.१२-: खरेदी-विक्री संघाचा मी सभासद असल्याने मी ही मतदान केलं. परंतु भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेना ही एकत्र निवडणूक लढत असून निश्चितच आमचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.

दरम्यान खरेदी विक्री संघ हा जर एक वेगळा उंचीवर नेऊन ठेवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही एकत्र लढत आहोत. तसेच ही निवडणूक बिनविरोध देखील करायची होती. परंतु ती होऊ शकली नाही. त्यामुळे नक्कीच विजय हा आमचा असेल असे केसरकर यावेळी बोलताना म्हणाले. श्री. केसरकर यांनी आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर येऊन आपला आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

You cannot copy content of this page