स्वतःचे अपयश झाकण्यासाठी साळगावकरांची माझ्यावर वायफळ टीका

दिलेला निधी खर्ची करण्यात साळगावकर अपयशी तर संजू परब यशस्वी;शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे साळगावकरना प्रत्युत्तर

⚡सावंतवाडी ता.१२-: बबन साळगावकर नगराध्यक्ष असताना मी शहर विकासासाठी मोठा निधी दिला परंतु तो त्यांना खर्च करता आला नाही. त्यामुळे आपलं अपयश झाकण्यासाठी ते माझ्यावर वायफळ टीका करत आहेत अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बबन साळगावकर यांच्या टीकेचा समाचार घेतला. दरम्यान त्यानंतर नगराध्यक्ष झालेल्या संजू परब यांनी मी दिलेला निधी तरी खर्च केला अशी पुस्ती ही त्यांनी यावेळी जोडली.श्री. केसरकर आज खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले असता यावेळी त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला.

You cannot copy content of this page