⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि.७ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.
यानिमित्त देवीची पुष्पपूजा, मंदिरात फुलांची सजावट, रात्रौ ११ वा. तरंगदेवता, श्री रामेश्वर व श्री सातेरी यांची मंदिराला पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी भाविकांनी देवी दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे केले आहे.
फोटो – श्री सातेरी पालखी व तरंगदेवता
