देवगड तालुका शिवसेना महिला संघटक पदी हर्षा ठाकूर यांची निवड

⚡देवगड ता.०२-: देवगड तालुका शिवसेना महिला संघटक पदी सौ हर्षा ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल देवगड शिवसेना, युवा सेना ,महिला आघाडी ,यांच्या वतीने विशेष सत्कार शिवसेना देवगड तालुका संपर्क कार्यालयात करण्यात आला.

यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल उप तालुकाप्रमुख तथा नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी युवा सेना तालुकाप्रमुख निनाद देशपांडे, महिला शहर संघटक,स्वप्नाली वाल्मिकी, पडेल विभाग प्रमुख संदीप डोळकर कुवळे विभाग प्रमुख विश्वनाथ परब पोयरे विभागप्रमुख दत्तप्रसाद धुरी ,शिवसैनिक काका जेठे, अण्णा खवळे महेंद्र भुजबळ ,प्रविंद कावले दर्शन कावले ऍड प्रसाद करंदीकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page