सभेत एकूण ११ ग्रामसं संघांचा सहभाग*
⚡सावंतवाडी ता.०२सहदेव राऊळ -: मळेवाड येथे एकता प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मळेवाड येथील सुदर्शन सभागृह येथे पार पडली.
यावेळी प्रभाग संघातील ग्राम संघांची, समूहातील सदस्यांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेत एकूण अकरा ग्राम संघांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ग्राम संघातील सदस्यांना प्रशस्तीपत्रक, चषक, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त व्यक्त करून सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्राम संघातील ,समूहातील सदस्यांनी आपली मत मांडली.
यावेळी मळेवाड कोंडूरे सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, आरोस सरपंच शंकर नाईक, न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोस्कर, दांडेली ग्रामपंचायत सदस्य उमा पांगम,,नाणोस सरपंच वासुदेव जोशी, गुळदुवे सरपंच शितल जोशी , संदीप नेमळेकर, आपत्कालीनचे न्हानू मुळीक , पत्रकार मदन मुरकर, तालुका व्यवस्थापक स्वाती रेडकर, शिवानंद गवंडे, रितिमा पाटकर, तळवडे सी. सी. नाईक सर मळेवाड सी. सी पावरा सर, प्रभाग संघ व्यवस्थापक प्रचिती मडुरकर , प्रभाग संघ पदाधिकारी कार्यकारणी, समूह , सदस्य उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल साटेलकर यांनी तर आभार तृप्ती कानजी यांनी केले. अकरा ग्राम संघ उपस्थित होते. यावेळी महिलांची उपस्थित लक्षणीय होती. प्रभागातील ग्रामसंघाच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांचे विशेष कौतुक करून सन्मान करण्यात आला. यात प्रभागात ओम गणेश ग्रामसंघ न्हावेली, विकास ग्रामसंघ , गुळदुवे, वेतोबा ग्रामसंघ मळेवाड, आदर्श समूह, मैत्री समूह न्हावेली, अष्टविनायक समूह साटेली, लक्ष्मी समूह मळेवाड, श्रमिक समूह दांडेली, शक्ती समूह आजगाव या सर्व ग्राम संघाचा प्रमाणपत्र, चषक, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कॅडल एल एस सी मॅनेजर, सीआरपी, सीनिअर, सीआरपी एम सी आर पी, कृषी सखी, पशु सखी उद्योग लेखापाल, सखी, लिपिका ऑडिटर यांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
