राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-:केंद्र शासनाच्या सन 2020-21 या वर्षाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारचे वितरण करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती https://awards.gov.in या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.*

        ज्या युवक, युवती व संस्थांना राष्ट्रीय युवा पुरस्कार 2020-21 साठी अर्ज, प्रस्ताव सादर करावयाचे आहे, त्यांनी प्रथमत: वरील ऑनलाईन संकेत स्थळावर दि. 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज भरण्यात यावे. त्यानंतर त्या अर्जाच्या दोन प्रती शिफारशीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर कराव्यात.
You cannot copy content of this page