देवगड फिशरमेन्स सोसा.चेअरमन पदी द्विजकांत कोयंडे, व्हॉइस चेअरमन उमेश आंबेरकर यांची बिनविरोध निवड

⚡देवगड ता.०२-:
देवगड फिशरमेन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड देवगड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ते २०२७ या कालावधीसाठी घेण्यात आलेली निवडणूक बिनविरोध झाली आहे.

अध्यासी अधिकारी पी. एल. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी २ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३वाजता संस्थेच्या कार्यालयामध्ये संस्थेच्या चेअरमनपदी द्विजकांत विठ्ठल कोयंडे व व्हॉइस चेअरमन पदी उमेश पांडुरंग आंबेरकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली असून या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळामध्ये प्रदीप प्रकाश कोयंडे ,उपेंद्र नागेश लोणे, राहुल उमाकांत मुणगेकर, उल्हास कमलाकर मणचेकर, महेश बाळकृष्ण सागवेकर, प्रियांका गुरुनाथ वाडेकर, श्रीमती शुभांगी सुधाकर कदम ,सईद इब्राहिम सोलकर ,श्रीराम पुंडलिक देवगडकर, यांचे बिनविरोध निवड झालेली आहे. या निवड प्रसंगी ह संस्थेचे सभासद जगन्नाथ दत्तात्रय कोयंडे ,दत्ताराम विनायक कोयंडे, सजाउद्दीन सोलकर, संस्थेचे प्रभारी सचिव विवेक सुर्वे व सहाय्यक सचिव उमेश कदम उपस्थित होते. नवनिर्वाचित सर्व संचालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page