⚡वेंगुर्ले ता.०२-: वेंगुर्ले नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना नवी मुंबई येथील महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या संस्थेतर्फे ‘दी प्राईड ऑफ महाराष्ट्र : एमजेएफ अवॉर्ड’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. यानिमित्त वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष तथा मा. नगरसेवक विधाता सावंत, महिला शहर अध्यक्ष तथा मा.नगरसेविका कृतिका कुबल, मा.नगरसेवक दादा सोकटे आदी उपस्थित होते.
वेंगुर्ले न.प. प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांचा राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सन्मान
