कणकवलीतील नागरिकांची सतर्कता
⚡कणकवली ता.०२-: नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटा रंग्या सापडला असून कणकवली शहरात पहाटे 6 वा. च्या सुमारास भालचंद्र महाराज संस्थानकडील बालगोपाळ हनुमान मंदिर मधील दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्या एका चोरट्याला कणकवलीतील सतर्क नागरिकांनी रंगेहाथ पकडले. बुधवारी सकाळी ही घटना घडली.
कणकवलीतील बालगोपाळ हनुमान मंदिर ची दाना पेटी फोडत असताना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, अनिल अणावकर यांच्यासह तेथील काहींनी या चोरट्याला पाहिले. व त्याला रंगेहाथ पकडले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या खिशात अजून दान पेट्या फोडलेली रक्कम व पान पट्ट्यांमधील गुटखा, पान मसाला अशा देखील वस्तू आढळून आल्या. याबाबत चोरट्याकडे नागरिकांनी चौकशी केली असता नागवे रोड वरील राम मंदिर मधली दानपेटी चोरट्याने फोडल्याचे सांगितले. या चोट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून, या चोरट्यासोबत अजून एक तरुण होता. मात्र नागरिकांची जाग मिळताच त्यांने पलायन केले. दरम्यान पोलिसांकडून आता या चरोट्याची चौकशी सुरू करण्यात आहे. कणकवलीतील नागरिकांनी पोलीस स्टेशनला
