अधिकारी, कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन
वैभववाडी संजय शेळके
आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखेत भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. ठेवी जमा करणे, कर्ज वसुली उद्दिष्ट पूर्तता करणे याबाबत माहिती घेतली. उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, नेहा माईणकर, प्राची तावडे, बंड्या मांजरेकर, किशोर दळवी, प्रकाश पाटील, स्वप्नील खानविलकर, प्रकाश सावंत, शाखा व्यवस्थापक श्री तांबे, पी. पी. कुडतरकर, सुरेश रावराणे व आधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा बँकच्या वतीने नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
फोटो – वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांचा सत्कार करताना जिल्हा बँक अधिकार व कर्मचारी. यावेळी उपस्थित संचालक व पदाधिकारी.
छाया संजय शेळके वैभववाडी
