जिल्ह्यात पहिला पक्षी निरीक्षण कार्यक्रम तळकट वन उद्यानात संपन्न

२० हून अधिक निसर्ग प्रेमी, छायाचित्रकार झाले होते सहभागी

⚡बांदा ता.०१-: मृगया एक्सपीडिशन आणि सिंधुदुर्ग वाइल्ड टुर्सच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहीलाच जंगल बर्डवॉक (पक्षी निरीक्षण) आज तळकट (ता. दोडामार्ग) वन उद्यानात घेण्यात आला. यावेळी हौशी निसर्ग प्रेमी, छायाचित्रकर, पक्षी निरीक्षक यांनी सहभागी होत २० हुन अधिक पक्षांच्या प्रजाती अभ्यासल्या.
या बर्ड वॉक मध्ये घनदाट जंगलात अधिवास असलेल्या मलबारी कर्णा, मोठा काळा सुतारपक्षी, राखी डोक्याचा बुलबुल, गोव्याचा राज्य पक्षी माणिक कंठी बुलबुल, काळटोप हळद्या अशा वीसहुन अधिक प्रजाती जळवून पाहता आल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात समृद्ध वनसंपदा असल्याने याठिकाणी पक्ष्याच्या अनेक दुर्मिळ प्रजातींचा अधिवास आहे. निसर्ग रक्षणातही या प्रजातींचा मोठा सहभाग आहे. बर्ड वॉकच्या माध्यमातून येथील दुर्मिळ पक्ष्याची माहिती लोकांना तसेच स्थानिकांना मिळावी, भविष्यात यातून रोजगार निर्मितीचे दालन देखील स्थानिकांना खुले होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत २०० हुन अधिक पक्ष्याच्या जातीचा शोध घेण्यात आला आहे.
भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यासाठी निसर्ग अभ्यासक घडविण्यात येणार आहेत. यासाठी दर रविवारी वेगवेगळ्या जंगलात बर्ड वॉक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उपस्थिताना वन्यजीव अभ्यासक गजानन शेट्ये, प्रवीण सातोसकर, प्रा. धिरेंद्र होळीकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पक्षी निरीक्षक संजय सावंत, संजय नाटेकर, सुनील नातू, सुप्रिया नातू, सई धारगळकर, अद्वैत नातू, प्रशिल आरोलकर, सूरज परब, ओंकार चांदेकर, कौस्तुभ चांदेकर, वेदांत चांदेकर, अमरेश चांदेकर, नेल्सन फर्नांडीस, यत्नेश होबले, संकेत नाईक, पालवी नाईक, निनाद सुतार, अजिंक्य गवस, चैतेश देसाई आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page