सिंधुदुर्गात लवकरच दशावतार नाट्य महोत्सव

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने होणार आयोजन;कोकण विभाग सहसंयोजक शरद पेंडसे यांची वेंगुर्ले भाजपा कार्यालयाला भेट

⚡वेंगुर्ला ता.०१-: भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे कोकण विभाग सहसंयोजक शशिकांत शरद पेंडसे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. सिधुदुर्गात लवकरच भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, तालुका उपाध्यक्ष दिपक नाईक, शक्तीकेंद्र प्रमुख संतोष शेटकर, महेश सावंत, विश्वनाथ परब, गोविद परब, वासुदेव पांगम आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page