मातृत्व मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन

२४ तास देणार सेवा

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरात प्रथमच २४ तास सेवा देणाऱ्या मातृत्व मेडिकल स्टोअर्सचा शुभारंभ आज सेवानिवृत्त आरोग्य सेवक विष्णू परब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.
बांदा शहर हे महामार्गवरील महत्वाचे शहर असून आतापर्यंत रात्रीच्या वेळी आरोग्य सुविधा उपलब्ध नव्हती. रुग्णांची गरज ओळखून युवा उद्योजक विराज परब यांनी मातृत्व मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून २४ तास सेवा देण्याचा निर्णय घेतला. केवळ औषधेच नसून विविध तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य सेवा देखील पुरविण्यात येणार आहे. याठिकाणी रुग्णांच्या आजाराचे तात्काळ निदान करण्यासाठी अद्यायावत प्रयोगशाळा देखील उभारण्यात आली आहे.
यावेळी विराज परब, डॉ. सौ. चेतना परब, सौ. विद्या परब, सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पत्रकार निलेश मोरजकर, आशुतोष भांगले, अजित दळवी, मंगल कामत, प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, राकेश परब, जय भोसले, शैलेश गवस, अमेय गवस, अमोल सावंत आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page