रुपेश राऊळ; मतदार संघात बॅकफूटवर गेल्याने घेतला नाही मतदारसंघात मेळावा…
⚡सावंतवाडी ता.०९-: राणे कुटुंबांनी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना दिलेली उपमा वरून शिंदे गट आणि भाजप मध्ये आमदार दीपक केसरकर यांची काय पात्रता आहे. ही त्यांना समजली असून, सावंतवाडी मतदारसंघात त्यांनी स्वःची हसा करून घेतला आहे. मतदार संघात आपण मागे पडत असल्याने त्यांनी मतदारसंघात येऊन २०० माणसांचा मेळावा देखील ते घेऊ शकले नाहीत. त्यांना त्यांची पात्रता समजली असल्याचा जोरदार टोला सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत लगावला आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, बाकीचे आमदार मतदार संघात परत जात त्यांनी लोकांची कामे करायला सुरुवात केली असून, अद्याप आमदार दीपक केसरकर मतदार संघात येत नसल्याचा टीका त्यांनी लगावला आहे. आमदार दीपक केसरकर यांनी गेल्या ७ वर्षात कधीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोन केला नाही. परंतु, आता त्यांना व त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आठवण झाली असून, ते आता त्यांना फोन करत असल्याचे देखील सांगितले आहे.
