सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज मंडळाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची फेरनिवड

⚡कणकवली ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची पुन्हा निवड झाली आहे.या मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा ओरोस येथे झाली. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सभासद बापू तळवडेकर, आबा तेली,दशरथ कवठकर, मधुकर बोर्डवेकर, बाळ आजगावकर उपस्थित होते.

मंडळाचे सचिव चंद्रकांत तेली यांनी मागिल तीन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेताना मंडळाच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. मंडळाचे जिल्हा कार्यालय कणकवली येथे स्वतःच्या जागेत असून विद्यार्थी गुणगौरव शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत, आकस्मित मदत व मार्गदर्शन असे उपक्रम चालू आहेत. मंडळाच्या आर्थिक व्यवहाराची विस्तृत माहिती त्यांनी दिली. सर्व सभासदांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यमान कार्यकारी मंडळ स्वतःचा वेळ व पैसा खर्च करून मंडळाच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशिल असल्याने विद्यमान पदाधिकारी पुढील कालावधीसाठी (सन २०२२ ते २०२५) असावेत असे सुचविण्यात आले. त्यानुसार आवश्यक ते फेरबदल करून कार्यकारी मंडळ जाहिर करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष लक्ष्मण वासुदेव तेली, उपाध्यक्ष सहदेव तेली व निलेश ज्ञानेश्वर कामतेकर, खजिनदार चंद्रकांत तेली, सचिव पशुराम झगडे, सहसचिव रमाकांत शेट्ये, सदस्य शैलेंद्र डिचोलकर, मैथिली तेली,अंकीता वाडेकर, नरहरी तेली, सुभाष शेटये, महेश तेली,रमेश चव्हाण, साईनाथ आंबेरकर, गुरुदास तेली, सुप्रिया वालावलकर, सुनिल नांदोस्कर, प्रकाश डिचोलकर, शुभदा डिचोलकर, अशोक पेडणेकर ,श्याम निवेलकर, दिनकर तेली, रामदास दाभोलकर, सल्लागार एकनाथ तेली, बापू तळवडेकरव आबा तेली यांची निवड करण्यात आली. यावेळी सुनिल नांदोस्कर, महेश तेली, शाम निवेलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page