भाजप बांदा सह शहर अध्यक्षपदी ज्ञानेश्वर सावंत यांची निवड…

⚡बांदा ता.०८-: बांदा मंडल भारतीय जनता पार्टीच्या बांदा मंडलातील बांदा सह शहरअध्यक्षपदी ज्ञानेश्वर पांडुरंग सावंत यांची निवड करण्यात आली आहे. बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांनी नियुक्ती केलेले पत्र माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते श्री सावंत यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा प्रवक्ते संजु परब, मंडल उपाध्यक्ष बाळू सावंत, मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, युवा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, बांदा सरपंच अक्रम खान, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, युवा उपाध्यक्ष संदीप बांदेकर, शक्ती केंद्रप्रमुख प्रवीण देसाई, युवा उपाध्यक्ष साईनाथ धारगळकर, सिद्धेश महाजन, बूथ अध्यक्ष सागर सावंत, बूथ अध्यक्ष निलेश सावंत, स्वप्नील सावंत, समीर सावंत, निलेश देसाई, बालम आगा यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले कि, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात भाजप सक्षम करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार आहोत.

You cannot copy content of this page