कणकवली व्यापारी संघातर्फे
१३ ऑगस्टला चित्रकला स्पर्धा

⚡कणकवली ता.०८-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती व स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात आणि अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण होऊन देशभक्तीची जाज्वल्य भावना त्यांच्या
मनात तेवत रहावी या उद्देशाने व्यपारी संघ कणकवलीतर्फे चित्रकला स्पर्धा शनिवार १३ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता येथील परमहंस भालचंद्र महाराज
संस्थानातील सभागृहात आयोजित केली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार,नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थित होणार आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी
व आठवी ते दहावी अशी दोन गटांत होणार आहे. गट १ साठी शाळेच्या प्रांगणातील ध्वजारोहणाचा प्रसंग, गट २ साठी स्वातंत्र्य लढयातील कोणताही एक प्रसंग हा विषय आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी १० ऑगस्टपर्यंत प्रसाद राणे (९४२२३७४१२७), राजेश राजाध्यक्ष (९४२१६४४०८०) यांच्याकडे संपर्क साधून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत
सहभाग घ्यावा, असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page