कणकवली पोलिस ठाण्यात आरोग्य तपासणी शिबिर

⚡कणकवली ता.०६-: राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन तर्फे नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात आरोग्य तपासणी केली रक्तदाब, मधुमेह, व जनरल तपासणी करून औषधे वाटप केले.
यात एकूण 56 कर्मचारी वर्गाची व कणकवली तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची तपासणी करण्यात आली असून काहीचे बीपी हाय होते तर काहिंचे कमी होते .तर शुगरचीही तपासणी केली असता यात ही काहींची शुगर वाढली असल्याचे दिसून आल्याचे डॉ दत्ता तपसे यांनी बोलताना सांगितले आहे.
डॉ. दत्ता तपसे यांनी सांगितले की, पोलिसांच्या ताणतणाव या धकाधकीच्या जीवनात आरोग्य तपासणी महत्वाची असून आपल्या राजमुद्रा फाउंडेशन तर्फे सदर शिबिर आयोजित केले असल्याचे सांगितले आहे.
डॉ. मोहिनी तपसे, समुदाय वैद्यकीय अधिकारी तेजस्विनी पारकर यांनी तपासणी करण्यात डॉ दत्ता तपसे यांना मदत केली.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी आभार व्यक्त केले.पोलीस सहायकनिरीक्षक सागर खंडागळे व इतर पोलिस ठाण्याचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page