नांदरूख येथील अमृतसरोवरला” जिल्हाधिकारी के. मंजुलश्र्मी यांनी दिली भेट

⚡कणकवली ता.०५-: “स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पार पडणाऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या योजने अंतर्गत कोकणात विशेषतः तळकोकणात स्थानिक पाश्र्वभूमीवर उपयुक्त ठरेल व कमीत कमी खर्चात सहज बांधता येईल, अशा स्वरूपाची या बंधाऱ्याची रचना असुन शेकडो वर्षे हा बंधारा कायम राहील अशा पद्धतीने स्थानिकांच्या सहकार्यातुन या बंधाऱ्याचे काम सुरू आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांच्या संकल्पनेतून व स्थानिक लोकसहभागातून होणारे विशेष उल्लेखनीय बाब म्हणुन जिल्हाधिकारी के.मंजुलश्र्मी यांनी या बंधाऱ्यांच्या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवुन समाधान व्यक्त केले.

यावेळी कार्यकारी अभियंता जि.प. पाणीपुरवठा उदयकुमार महाजनी, लघुपाटबंधारे अभियांता जी.भोसले. सरपंच श्री दिनेश चव्हाण, ग्रामसेवक श्री महेंद्रभाऊ मोरे, तलाठी सौ. समीरा सावंत, युवासेना कुंभारमाठ पं.सं उपविभागप्रमुख राहुल परब,सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर, शाखाप्रमुख समीर पाटकर,ग्रामस्थ काशिनाथ चव्हाण, रमेश पोमजी चव्हाण,विनोद चव्हाण, संदेश घाडीगावकर, सुनिल चव्हाण, नंदु चव्हाण,स्वप्नीलसाळकर, घनश्याम परब, आदी विशेष उपस्थीत होते.

याप्रसंगी संबंधित तलावाच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी तसेच ओपन जिम उभारण्यासाठी भरिव निधी देण्याचे अभिवचन मा. जिल्हाधिकारी यानी दिले.

You cannot copy content of this page