शिवसेना देवगड प्रभारी तालुका प्रमुखपदी जयेश नर यांची नियुक्ती…

देवगड (प्रतिनिधी) :
तालुक्यातील उंडील गावचे शिवसेनेचे
लोकनियुक्त सरपंच जयेश अशोक नर यांची शिवसेना देवगड प्रभारी
तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, पक्षसचिव खा.
विनायक राऊत आणि जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर
यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी
केली आहे. जयेश नर यांची पोंभुर्ले, बापर्डे, पडेल, पुरळ
विभागाच्या प्रभारी तालुकाप्रमुख पदी नियुक्ती केल्याचे पत्र जिल्हाप्रमुख
पडते यांनी दिले आहे.

You cannot copy content of this page