रविवार ७ अॉगस्ट रोजी होणार शपथविधी
⚡बांदा ता.०५-: बांदा शहरात लायन्स क्लब आॅफ सावंतवाडी पुरस्कृत लायन्स क्लब आॅफ बांदाची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या संस्थापक अध्यक्षपदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारी मंडळाचा शपथविधी, पदग्रहण व चार्टर प्रदान सोहळा रविवार ७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब आॅफ सावंतवाडीचे माजी अध्यक्ष अॅड. परिमल नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नाईक यांनी लायन्स क्लबच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, भारतात सर्वात जास्त सदस्य लायन्स क्लबचे आहेत. शिकागोत ७ जुलै १९१७ लायन्स क्लबची स्थापना झाली. सेवा हा क्लबचा मुख्य उद्देश आहे. लायन्स क्लबचे काम राजकारण विरहित चालते. राजकारणाची वस्त्रे बाजूला ठेऊन काम केले जाते. सामाजिक उपक्रम तळागाळापर्यंत पोहचावेत यासाठी क्लबचे सदस्य काम करीत असतात.
ते पुढे म्हणाले, लायन्स क्लब आॅफ बांदा हा सिंधुदुर्गातील ६ वा क्लब आहे. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या उदात्त हेतूने क्लबची स्थापना केली आहे. गेल्यावर्षीच्या पूरस्थितीत शेर्ले, दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम भागात बाधितांना मदत पुरविण्यात लायन्स क्लब आघाडीवर होते. कोरोना काळात डॉक्टर व आरोग्य विभागातील कर्मचार्यांना पीपीई कीट पुरविण्यात लायन्स क्लब पुढे होते. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल उभारणी सारखे सामाजिक उपक्रम लायन्स क्लबमार्फत सातत्यपूर्ण राबविले जातात.
लायन्स क्लब अॉफ बांदा कार्यकारिणी मंडळाचा शपथविधी, पदग्रहण व चार्टर प्रदान सोहळा रविवार ७ अॉगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता स्वामी समर्थ हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी प्रांतपाल सुनील सुतार, दीक्षाप्रधान अधिकारी अॅड. विजय जमदग्नी, आप्पा वणजू, माजी प्रांतपाल उदय लोध, केशव फाटक, रिजन चेअरमन आशिष मेहता, झोन चेअरमन सागर तेली, ओंकार फडके, माजी रिजन चेअरमन संजू पटेल, अशोक देसाई उपस्थित राहणार आहे.
लायन्स क्लब अॉफ बांदा संस्थापक संचालक मंडळात अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, उपाध्यक्ष अभिलाष देसाई, मकरंद तोरसकर, जावेद खतीब, सचिव समीर कोलते, सहसचिव गजानन सावंत, खजिनदार नाना सावंत, सह खजिनदार साईप्रसाद काणेकर, रणधिर रणसिंग, दीपक सावंत, गोविंद सावंत, साईनाथ धारगळकर, मधुकर देसाई, अक्रम खान, सिद्धेश महाजन, राजेश विरनोडकर, राजाराम सावंत, घनश्याम सावंत, कुतबुद्दीन शेख, नवनित देसाई, कैलास जाधव, स्वप्निल सावंत, निलेश मोरजकर, विनेश गवस, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, प्रविण देसाई, सागर सावंत, अक्षय परब व वासुदेव भोगले आदी सदस्यांचा शपथविधी होणार आहे. सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स क्लब सावंतवाडीचे माजी अध्यक्ष अॅड. परिमल नाईक, माजी सचिव अमेय पै, माजी खजिनदार प्रसाद राऊत, विद्यमान अध्यक्ष विद्याधर तावडे, सचिव अॅड. अभिजित पणदूरकर, खजिनदार अरविंद पोकार यांनी केले आहे.
