माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांचा वाढदिवस

भाजप युवा नेते विशाल परब यांनी गोव्यात जावून दिल्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.०५-: माजी केंद्रीय कायदामंत्री ऍडव्होकेट रमाकांत खलप यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे.अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील या भव्य दिव्य कार्यक्रमात रमाकांत खलप यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार आहे.या वाढदिवसानिमित्त भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज गोव्यामध्ये रमाकांत खलप यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांमध्ये दीर्घकाळ विविध विषयावर चर्चा झाली.

You cannot copy content of this page