उभाबाजार येथील चोरी प्रकरणी संशयितास एक दिवसाची पोलीस कोठडी

⚡सावंतवाडी,ता.०४-: महेश शेणई यांच्या उभाबाजार येथील घरात चोरी केल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सचिन राजू माने याला आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संशयिताला पोलिसांनी काल न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेतले होते. तर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याबाबतची माहिती या गुन्ह्याचे तपासणी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते यांनी दिली.

You cannot copy content of this page