केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा १० ते १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

राजन तेली यांची माहिती; १३ ऑगस्ट रोजी सावंतवाडीत कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

⚡सावंतवाडी ता.०४-: केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा हे १० ते १३, रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकसभाप्रवास योजने अंतर्गत ते प्रवास करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान १३ रोजी ते सावंतवाडी येथे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती तेली यांनी यावेळी दिली.

यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघ हा त्यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पुढील १८ महिने ते या ठिकाणी प्रवास करणार आहेत. या दीड वर्षात ते साधारण तीन महिन्यातून एकदा या ठिकाणी येणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी राजवाडा येथील हॉल मध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page