Headlines

हर घर तिरंगासाठी पोस्टाचा पुढाकार

ऑफलाईन व ऑनलाईन तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध;अधीक्षक जी जनार्दन रेड्डी यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता ०४
भारतीय डाक विभागामार्फत ” हर घर तिरंगा ” अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास या अभियानात सहभागी होता यावे यासाठी सिंधुदुर्ग विभागातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यांची नाममात्र फी २५ रुपये एवढी आहे. तसेच डाक विभागाच्या ई – पोस्ट साईटवर जाऊन देखील राष्ट्रध्वजाची ऑनलाईन खरेदी करता येईल . जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक पोस्ट कार्यालयात राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध असून पोस्ट ऑफिसमध्ये थेट खरेदीही करता येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग डाक विभागाचे अधीक्षक जी जनार्दन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चालू वर्ष हे भारत सरकार मार्फत ” आझादी का अमृत महोत्सव ” म्हणून साजरे केले जात आहे . तसेच देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात ” हर घर तिरंगा ” अभियान राबविले जाणार आहे . या अभियानांतर्गत सरकार तर्फे देशातील प्रत्येक नागरिकानी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे . भारतीय डाक विभागामार्फत ” हर घर तिरंगा ” अभियान राबविले जात आहे . या मध्ये सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत विविध कार्यक्रम व मोहीम राबवून या अभियानाबाबत जास्तीत जास्त जन जागृती केली जाणार आहे . डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या अभियानाबाबत अधिक माहिती देत असतांना विभागाचे डाकघर अधीक्षक जी . जनार्दन रेड्डी यांनी सांगितले कि , जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास या अभियानात सहभागी होता यावे यासाठी जिल्ह्यात डाक विभागा मार्फत १४ हजार राष्ट्र ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग विभागातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत .ज्याची किंमत मात्र रु .२५ एवढी आहे . तसेच डाक विभागाच्या ई – पोस्ट साईटवर जाऊन देखील राष्ट्रध्वजाची ऑनलाईन खरेदी करता येईल . जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक पोस्ट कार्यालयात राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध असून पोस्ट ऑफिसमध्ये थेट खरेदीही करता येईल . त्याच बरोबर जिल्ह्यातील काही निवडक पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांसाठी व सर्व नागरिकांसाठी लवकरच सेल्फी पॉईंट तयार केले जाणार आहेत . अशा उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेऊन # IndiaPost4Tiranga #HarGharTiranga #AmritMahotsav असा हॅश टॅग वापरून सोशल मिडीयावर शेअर करावी. असे आवाहन सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत करण्यात येत आहे . तसेच जिल्ह्यातील नागरिक , शैक्षणिक संस्था किंवा सरकारी आस्थापना इ . यांना मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज खरेदी करायचे असतील तर अशा बल्क ऑर्डर देखील पोस्ट ऑफिसमार्फत स्वीकारल्या जातील अशी माहिती डाकघर अधीक्षक यांनी दिली व डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या अभियानात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन भारत सरकारने केलेल्या आवाहनानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावून हा ऐतिहासिक स्वातंत्र्य दिन साजरा करवा. असे आवाहन यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा डाकघर अधीक्षक जी जनार्दन रेड्डी यांनी केले .

You cannot copy content of this page