रानभाज्या महोत्सवाला अभिनेते अनिल गवस यांची उपस्थिती लाभणार

⚡कणकवली ता.०४-:
कणकवली येथे स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघाच्या 16 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून होणाऱ्या “रानभाज्या महोत्सवाला”स्वराज्य रक्षक संभाजी मधील हंबीर मामा व स्वामिनी मालिकेतील संताजी ची भूमिका गाजवणारे अनिल गवस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे महाविद्यालयीन युवक युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.
कोरोना काळात आरोग्याचे महत्त्व सर्व नागरिकांना किती आहे हे कळलेले आहेच. रानभाज्यांचे आरोग्य विषयी महत्त्व काय आहे याविषयीचे मार्गदर्शन आयुर्वेदाचार्य निलेश कोदे करणार आहेत.
6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या रानभाजी महोत्सवाला,प्रदर्शन व पाककला स्पर्धेला कणकवली तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी,महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत व कणकवली कॉलेजचे प्राचार्य श्री.चौगुले यांनी केले आहे.
वेळ:१० ते १३:३०
पाककला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ९४२०३०६३०६
९४२२५९६६२१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page