सक्षमपणे आगामी निवडणुकीला सामोरे जाणार

राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत मालवण येथे निर्धार

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुका काँग्रेस कमिटीची बैठक तातडीची बैठक पदाधिकारी अरविंद मोंडकर यांच्या मालवण फोवकांडा पिंपळ येथील निवास्थानी प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी इर्शाद शेख यांनी मार्गदर्शन करत आपण सक्षमपणे आगामी निवडणुकांना सामोरे जाऊया असे सांगितले.

या बैठकीस तालुक्यातील सर्व सेल, विभाग पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत भविष्यात होणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूकी बाबत काँग्रेसच्या वाटचालीबाबत चर्चा झाली. संघटनेत चढ उतार हे असतात त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येउन प्रामाणिक काम केल्यावर यश लांब नाही, असे प्रांतिक सदस्य सईनाथ चव्हाण यांनी यावेळी सांगितले. यासोबत पक्षसंघटना बळकटी साठी प्रयत्न करत कुडाळ नगरपंचायत प्रमाणे मालवण नगरपरिषद मध्ये देखील आपली तुल्यबळ ताकद आजमावणार असे अरविंद मोंडकर यांनी सांगितले. तसेच संघटना बांधत उमेदवार चाचपणी गावागावात जाऊन करूया असे बाळु अंधारी व देवानंद लुडबे यांनी तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांना सांगितले.

यावेळी महिला सक्षमीकरण करण्यासाठी संध्याताई सव्वालाखे यांनी दिलेल्या आदेशानुसार महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या मान्यतेने मालवण शहर महिला अध्यक्ष पदी गीता नेवाळे व शहर उपाध्यक्षा पदी शोभना चिंदरकर यांची निवड करण्यात आली. यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी, युवक माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा सदस्य संदेश कोयंडे, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, शहर अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, चंदन पांगे, पल्लवी तारी, गणेश पाडगावकर, महिला तालुकाध्यक्षा ममता तळगावकर, अमृत राऊळ, हेमंत माळकर, लक्ष्मीकांत परुळेकर, हेमंत तळवडेकर, बाबा फर्नांडिस, योगेश्वर कुर्ले, महेंद्र मांजरेकर, कांबळी, श्रेयस माणगांवकर, विष्णू देऊलकर, हेमंत, गीता नेवाळी, शोभा चिंदरकर, हेमंत कांदळकर, प्रणित बिलये, समीर मेथर,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page