रस्ता झाला बंद;१५ ऑगस्ट पासून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा बाबुराव धुरी यांचा इशारा
दोडामार्ग ता.०३-:
वझरे येथे नवीन पूल बांधण्यात येत आहे, त्यासाठी गेले वर्षभर वझरे – तळेखोल – विर्डी रस्ता बंद आहे. याठिकाणच्या ग्रामस्थांनी आता पर्यंत सदरच्या ठेकेदाराला योग्य सहकार्य केले होते, मात्र सध्या ठेकेदाराने पुलाचे काम अर्धवट ठेवून ग्रामस्थांची गैरसोय करून ठेवली आहे सदरचा रस्ता पुलासह १० ऑगस्ट पर्यंत खुला न केल्यास १५ ऑगस्ट पासून पुलाच्या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सदरचा मार्ग बंद असल्याने या पंचक्रोशीतील लोकांचे हाल होत आहेत, चतुर्थीचा सण जवळ आल्याने लोकांना बाजार रहाट करण्यासाठीं या रस्त्याची आवश्यक्यता आहे. लोकांना औषध उपचार काम धंदा हाही याच मार्गाने जाऊन करावा लागतो त्यासाठी हा रस्ता खुला होणे गरजेचे आहे.
