वन विभागाच्या केले स्वाधीन
दोडामार्ग ता.०३-:
कोनाळ तिलारी देव पातडेशोरमंदीर येथे आढळला दुर्मीळ कासव दोडामार्ग कोनाळ तिलारी येथील शेतकरी इज्मैल लोभो व इलिहस लोभो, जोच्सन लोभो आपली गुरे आणण्यासाठी तिलारीला गेले असता.त्याना तिलारी राज्यमार्गावर श्री देव पातडेशोर मंदीर येथे आज संध्याकाळी 6:00वाजता . दुर्मीळ प्रकारचा कासव आढळून आला.त्याला पाहण्यासाठी मोठया प्रमाणात तरुण युवक गर्दी करुन उपस्थित होते.
….याबाबतची माहिती कोनाळ वनविभाग अधिकारी श्री शिरवलकर , दत्ताराम मुकाडे ,रामराव लोंढे याना दिली त्यानंतर शेतकरी इझ्मिल लोभो सदर दुर्मीळ कासवाला वन विभाग अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी त्यांच्यासोबत कोनाळ ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे,उदय गवस, संतोष काळकुन्द्रीकर ,किशोर शेटवे जैवविवीधता समिती अध्यक्ष प्रविण गवस, आदी ग्रामस्थ तरुण युवक उपस्थतीत होते.
