स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव स्पर्धा
सावंतवाडी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव उपक्रम’ व ‘विविध स्पर्धा’ सन २०२२-२३ सांगेली केंद्रस्तरीय स्पर्धा जि. प. शाळा सावरवाड येथे संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.
चित्रकला स्पर्धा इ. ५ वी ते ७ वी गट
मंदार सत्यविजय राऊळ (इ. ७ वी) प्रथम क्रमांक तालुकास्तरीय निवड, इ. ८ वी ते १० वी गट चित्रकला स्पर्धा प्रणिता अजित कदम (इ. ९ वी) प्रथम क्रमांक – तालुकास्तरीय निवड
निबंध स्पर्धा इ. ५ वी ते ७ वी गट
सानवी निळकंठ गुरव (इ. ७ वी) तृतीय क्रमांक,
इ. ८ वी ते १० वी गट निबंध स्पर्धा
अमृता अरविंद पास्ते (इ. ९ वी) प्रथम क्रमांक – तालुकास्तरीय निवड
वक्तृत्व स्पर्धा – इ. ८ वी ते १० वी गट
मृणाली दशरथ देऊलकर (इ. ८ वी) तालुकास्तरीय निवड, प्रिती दशरथ पवार (इ. ८ वी) द्वितीय क्रमांक
प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक शरद सावंत, किशोर वालावलकर, विलास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
