वेंगुर्ले तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा

तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी कर्मचाऱ्यांचा केला सत्कार

वेंगुर्ले
वेंगुर्ले तहसिल कार्यालय येथे तहसिलदार प्रविण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी पदोन्नती मिळालेल्या दोन कर्मचाऱ्यांचा तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड झालेल्या तालुक्यातील दोन कर्मचाऱ्यांचा तहसिलदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, निवडणूक नायब तहसिलदार संदीप पाणमंद, नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे, मंडळ अधिकारी श्री. चव्हाण, धनंजय सिंगनाथ, के. एल. निग्रे, तलाठी, कोतवाल, ऑफिस स्टाफ, शिपाई आदी उपस्थित होते. खानोली कोतवाल पांडुरंग सरमळकर व मोचेमाड कोतवाल स्वप्निल गावडे यांना वेंगुर्ले तहसिल कार्यालय येथे शिपाई पदावर पदोन्नती मिळाल्याने त्यांचा महसूल दिनानिमित्त तहसिलदार प्रविण लोकरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून तालुक्यातील तलाठी सी. जी. वेतोरकर, तहसिल कार्यालय महसूल सहाय्यक मच्छिंद्र मुळीक, केळुस पोलिसपाटील पी. आर. केळुसकर यांची निवड झाली आहे. याबद्दल तलाठी सी.जी.वेतोरकर व महसूल सहाय्यक मच्छिंद्र मुळीक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा मागील महसूली वर्षांमध्ये सातबारा संगणकीकरण, उत्कृष्ट वसुली व इतर चांगल्या महसूल कामानिमित्त सत्कार करण्यात आला.

फोटो : महसूल दिनानिमित्त पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना तहसिलदार प्रविण लोकरे, सोबत अन्य

You cannot copy content of this page