दुसऱ्याची राजकीय कारकीर्द त्यांनी संपविली;माजी तालुकाप्रमुख उमेश कोरगांवकर यांचा आरोप
सावंतवाडी : दीपक केसरकर नगरसेवक असताना नगराध्यक्ष होण्यासाठी मदत केली होती परंतु ती मदत ते विसरले. शिवसेना म्हणजे गुंडांचा पक्ष अशी टीका त्यांनी केली होती तर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सहकार्य केले नाहीत आणि आज हिंदुतत्वाबद्दल आणि शिवसेनेबद्दल बोलत आहेत, अशी टीका माजी तालुकाप्रमुख उमेश कोरगावकर यांनी बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर केली आहे.
यावेळी त्यांनी केसरकर यांचा राजकारणातील गद्दारीचा इतिहास उलगडून दाखवला.निष्ठा यात्रेनिमित्त सावंतवाडीत आज आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेश कोरगावकर यांनी भाषणात केसरकरांवर हल्ला चढवला.
ते म्हणाले, आमदार केसरकर यांचे राजकीय कारकीर्दीचा आपण साक्षीदार आहोत सन १९९१ मध्ये ते नगरपालिकेमध्ये मागच्या दाराने स्विकृत नगरसेवक म्हणून आलेत. त्यांना साथ देणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी राजकीय दृष्ट्या संपवले. त्यावेळी नारायण राणे यांच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना संजीवनी दिली. मात्र त्यांनी शब्द पाळला नाही त्यांनी संदेश पारकर यांच्यासारख्याला सुध्दा फसवले.
