मतदान कार्डला आधार कार्ड जोडण्याचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.०१-: भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२१ अंतर्गत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. यामधील कलम २३ नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधारची माहिती संग्रहित करणेबाबतच्या सुधारणा अंतर्भूत आहेत. त्याआधारे मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम २६४ मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सदर सुधारणांची अंमलबजाणी १ ऑगस्ट २०२२ पासून लागू होणार आहे.

या सुधारणानंतर मतदार नोंदणी अधिकारी हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहीत स्वरुपात आणि रितीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. आधार क्रमांक मिळविण्याचा उद्देश मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि
भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे.

आधार क्रमांक देणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम २६ मध्ये नमुना अर्ज ६४ तयार करण्यात आलेला आहे. मतदाराला ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. ६४ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडील GARUDA APP. NVSP Website किंवा voter Help Line या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. दिनांक १ एप्रिल २०२३ पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती आधारक्रमांक उपलब्ध करुन देऊ शकतो.

सदर कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे सदर कार्यक्रमाची सूचना मतदारांना होण्यासाठी तहसिलदार सावंतवाडी यांनी नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page