माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वरचां ३३ वा वर्धापदिन उद्या

देवगड
कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर संचालित माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर ३३ वा वर्धापन दिन आणि बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक २० जुलै २०२२ रोजी सकाळी १० वाजता माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर येथे संस्थाअध्यक्ष राजेश वाळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे आंबा बागायतदार अजय नाणेरकर, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम तेली ,आंबा बागायतदार पुंडलिक नाणेरकर यांच्या आणि इतर मान्यवराच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.

तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे आवाहन शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर तालुका देवगड यांनी केले आहे.

You cannot copy content of this page