दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान;सकाळी ७ घडली घटना
सावंतवाडी : सावंतवाडी-आरोंदा मार्गे रेडीला जाण्याऱ्या एस. टी बसला मळेवाड येथे डंपरची धडक बसून भीषण अपघात झाला. हा अपघात आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
