स्थानिक गुन्हा अन्वेषणची गोवा बनावट दारूवर कारवाई

देवगड ता.१८-:
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांनी अवैध गोवा बनावटीच्या दारू बाबत धडक कारवाई करून देवगड किल्ला येथील प्रशांत आचरेकर यांचे कडून ६ हजार १००/- रुपयांचा गोवा बनावटीची हनी ब्लेंड प्युअर ब्रॅण्डिं हस्तगत केली आहे.

किंतानाच्या पांढऱ्या पिशवीत गोवा बनावटीचीची दारू स्वतः जवळ बाळगून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी स्थानिक गुन्हा अन्वेक्षण विभागाच्या पथकाने धाव घेतली व आरोपिकडून मुद्देमाल ताब्यात घेतला. आरोपीव या कारवाईत आरोपीकडून गोवा बनावटीच्या हनी ब्लेड प्युअर ब्रॅण्डिं ६१ बाटल्या प्रत्येकी १८० मीली च्या जप्त करण्यात आल्या. या घटने संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल रवी इंगळे यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून या घटनेतील आरोपी प्रशांत आचरेकर यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ ई नुसार कारवाई करण्यात आली आहे .या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक आर व्ही शेळके य यांच्यासमवेत पोलीस हवालदार ए.ए.गंगावणे, पोलीस नाईक एस एस खाडये,पो .कॉ रवी इंगळे , यांनी कारवाई केली. अधिक तपास देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक आशिष कदम करीत आहेत.

You cannot copy content of this page