देवगड
इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स ॲम्बेसिडर ऑर्गनायझेशन च्या देवगड शाखेची सभा राष्ट्रीय अध्यक्ष सौ. श्रुतिका देवेंद्र कडू प्रदेश सरचिटणीस विनोद भाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष दयानंद तेली,यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व या सभेमध्ये विशेष प्रश्नांवरती विचारविनिमय करण्यात आला.तसेच केलेल्या समाजोपयोगी कामांचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्ष श्रुतिका कडू याना प्राउड इंडियन पार्लमेंट अवॉर्ड २०२२ देण्यात आल्याबद्दल तसेच सदस्य रविकांत चांदोस्कर यांनी ३६ वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच सदस्य विजय कदम,दीपिका मेस्त्री, सुरेश कदम यांचेही कौतुक करण्यात आले.
या वेळी
जिल्हा समन्वय सुरेश कदम सहसचिव रवींद्र चिंदरकर, पोलीस प्रोटेक्शन चे अध्यक्ष विजय कदम, मिडीया अध्यक्ष दयानंद मांगले , एज्युकेशन बोर्डाचे अध्यक्ष तुकाराम तेली तसेच संस्थेचे खजिनदार गिरीश धोपटे तसेच संस्थेचे सभासद सौ दीपिका मिस्त्री सौ शामल जोशी सौ प्रीती वाडेकर प्रकाश जाधव , रविकांत चांदोस्कर , कौस्तुभ काळे नंदकिशोर परब उपस्थित होते.
