सावंतवाडी : नेमळे एरंडकवाडी येथे अवैध वाळू वाहतूक प्रकरणी चार डंपरांवर महसूल विभागाने आज दुपारी कारवाई केली होती. मात्र त्यातील दोन डंपर कारवाई चालू असताना चोरून पळून गेल्याने त्या अज्ञात दोन डंपर चालकांविरोधात कारवाईच्या पथकातील नेमळे तलाठी यांच्या तक्रारीनुसार येथील पोलीस ठाण्यात दोन डंपर चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डंपर चोरी प्रकरणी दोन डंपर चालकांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
