सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द…

आमदार दीपक केसरकर यांची ग्वाही…

⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहे असे आमदार दीपक केसरकर यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, संधी मिळाल्यानंतर त्या संधीचा फायदा जनकल्याणासाठी करण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न केला आहे तो तसाच यापुढे सुरू राहील.

आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस उद्या सोमवार दि.१८ जुलै रोजी आहे. मात्र या दिवशी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत असून मतदानासाठी मुंबई येथे थांबावे लागल्याने ते सावंतवाडी येथे येणार नाहीत असे म्हणाले. मात्र सिंधुदुर्गच्या जनतेने मला आतापर्यंत भरभरून प्रेम दिले आहे ते वृध्दिंगत होण्यासाठी आपण जनकल्याणाच्या योजना आणण्यासाठी कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले.

You cannot copy content of this page