इन्सुली बूथ क्रमांक १८० मध्ये गुरुवंदना कार्यक्रम संपन्न

भाजपचे आयोजन

⚡बांदा ता.१६-: भाजपच्या वतीने इन्सुली बूथ क्रमांक १८० मध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवंदना कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी येथील १२ ज्येष्ठ व्यक्तींचा झाडाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती मानसी धुरी, शक्ती केंद्र प्रमुख सुचिता शिंदे, महिला बूथ अध्यक्षा निकिता धुरी, सुमन धुरी, पल्लवी धुरी, प्रमिला धुरी, महानंदा धुरी, सुवर्णा धुरी, माधुरी तोरसकर, वृंदा धुरी आदी उपस्थित होते. यावेळी १२ व्यक्तींचा गौरव करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

You cannot copy content of this page