शिक्षणा बरोबर इतर उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा

मठबुद्रुक नं २ शाळा प्रवेश कार्यक्रमात माजी सभापती राजू परुळेकर यांचे आवाहन

मालवण दि प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेत यशाची उत्तुंग शिखरे गाठावे. मठबुद्रुक प्रशालेचे विविध शैक्षणिक उपक्रम हे निश्चितच विद्यार्थ्यांना दिशा देणारे आहेत असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश ऊर्फ राजू परुळेकर यांनी केले.


मठबुद्रुक शाळा क्रमांक दोनमध्ये शाळा प्रवेशोत्सव तसेच शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा दुसरा टप्पा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू परुळेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, पालकवर्ग, गुरुदेव केळुसकर, प्रमोद कदम,अशोक कदम, महिला, शिक्षक,अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
अभियान कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची शारीरिक, बौद्धिक, भाषिक, गणिती विकास यांची चाचपणी करून पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

You cannot copy content of this page