विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून वराडकर हायस्कुलच्या भिंती झाल्या बोलक्या

⚡मालवण ता.१९-: कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्षे विद्यार्थ्यांना शालेय जीवनाचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळेत प्रवेश केल्यावर मुलांचा आनंद व उत्साह कायम ठेवण्यासाठी कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालेय परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेच्या भिंतीवर विविध पोस्टर्स रंगवून त्यातून सामाजिक संदेश देण्यात आला.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी पुढाकार घेतला. प्रशालेचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील इयत्ता आठवी ,नववी व दहावीचे विद्यार्थी प्रतिक्षा मेस्त्री, सिद्धाली पांचाळ, सानिया कुडतरकर, मिथिल आंगचेकर, श्रेया चांदरकर, रुची ढोलम, पूर्वा मेस्त्री, पूर्वा चांदरकर, रश्मी पांचाळ, माजी विद्यार्थी आकाश बिरमोळे, राहुल जाधव, प्रसाद मेस्त्री, वेदांत पोटफोडे यांनी शाळेच्या दर्शनी भिंतीवर वेगवेगळे सामाजिक संदेश देणारी पोस्टर रंगविली. या कामात विद्यार्थ्यांचा सहभाग हा महत्त्वाचा होता. अतिशय उत्साहाने भिंतींवर ॲक्रीलिक कलरचा वापर करून या चित्रांमध्ये जीव ओतला. मुलींचे शिक्षण, योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व, पर्यावरण संवर्धन, मोबाईलचे दुष्परिणाम, धुम्रपानाचे दुष्परिणाम , पुस्तकांशी मैत्री, देशाभिमान असे सामाजिक संदेश देणारी पोस्टर्स विद्यार्थ्यांनी शालेय आवारातील भिंतीवर रंगविली. मे महिन्याच्या सुट्टी चा योग्य वापर करत मुलांनी कलात्मक वृत्तीला जोपासले. बऱ्याच वेळा असे रंगकाम प्रोफेशनल माणसांकडूनच करून घेतली जातात. परंतु या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींसाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत प्रवेशकर्ते झालेले विद्यार्थी शाळेचे बदललेले रूप पाहून भारावून गेले.

You cannot copy content of this page