⚡सावंतवाडी ता.१८सहदेव राऊळ-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेचा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीत नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला .
या सोहळ्यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनींचे जंगी स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीत नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशामध्ये स्वागत करून प्रशालेच्या सर्व महिला शिक्षिकांमार्फत त्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थी-विद्यार्थीनीना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय खेळाडू साहिश तळणकर याने रायफल शुटिंगमध्ये रौप्यपदक प्राप्त केल्याने पाहुण्यांच्यां उपस्थितीत त्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व पालकांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, संस्था संचालक रामचंद्र केळुसकर, स्कूल कमिटी सदस्य दीपक जोशी, चंद्रकांत जाधव, मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा सावंत, पर्यवेक्षक फाले सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मातोंडकर मँडम यांनी तर आभार फाले सर यांनी मानले.
