गणित प्रज्ञा शिष्यवृत्ती परीक्षेत आरपीडीचे यश

दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पात्र विद्यार्थी म्हणून सन्मान

⚡सावंतवाडी ता.१७ सहदेव राऊळ-: गणित प्रज्ञा शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पात्र विद्यार्थी म्हणून सन्मान मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इयत्ता पाचवी व आठवीसाठी गणित प्राविण्य परीक्षा आयोजित केली जाते. तसेच यातील यशस्वी विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यात म्हणजे प्रज्ञा परीक्षेसाठी संधी मिळते. यावर्षी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेप्रमाणेच गणित प्राविण्य परीक्षेमध्ये आणि आता प्रज्ञा परीक्षेत यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीतून कु. दळवी तन्वी प्रसाद व इयत्ता नववीतून कु. दळवी पारस प्रसाद या दोघांना प्रमाणपत्र पात्र विद्यार्थी म्हणून सन्मान मिळाला आहे.

You cannot copy content of this page