सातार्डा, बांदा तपासणी नाक्यावरील स्थानिक पोलिस दारूच्या गाड्या सोडतात

मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा आरोप : राज्य उत्पादन शुल्कचे काम प्रामाणिक

⚡सावंतवाडी ता.१७: राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी प्रामाणिक काम करत असताना सातार्डा, बांदा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांसह काही स्थानिक पोलिस दारूने भरलेल्या गाड्या सोडण्यासाठी व्यावसायिकांना मदत करत आहेत, असा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की चेकपोस्टवर चार-चार पोलिस कर्मचारी असताना सुद्धा दिवसाढवळ्या लाखो रुपयांची दारू या मार्गाने जाते, बेधडक पैसे घेतले जातात. हे प्रकार बंद करणे जमत नसतील तर पोलीस तपासणी नाके बंद करावेत, तसेच आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. आणि ते लवकरच आम्ही गृहमंत्र्यांकडे सादर करणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page