वेंगुर्ला येथे पावसाची जोरदार हजेरी…

झाडाची पडझड होऊन अनेकांचे नुकसान

⚡वेंगुर्ले ता.११-: मान्सूनने वेंगुर्ले तालुक्यातही जोरदार हजेरी लावली असून शुक्रवार पासून शनिवारी सायंकाळ पर्यंत पावसाची संतातधार सुरूच होती. दरम्यान शुक्रवारी पडलेल्या पावसात तालुक्यात काही प्रमाणात झाडांची पडझड होऊन नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.

शुक्रवार पासून मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी व पेरणी साठी सध्या मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान शुक्रवारी वेंगुर्ले किनारपट्टी वर जोरदार वारे वाहू लागले होते. यामुळे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान वेंगुर्ले दाभोसवाडा सुरेश वामन बटवलकर व येथीलच सिप्रियन फर्नांडिस यांच्या घरावर शेजारील भेंडीचे झाड पडून घरांच्या छप्परांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे यानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गेल्या २४ तासात वेंगुर्ले तालुक्यात ९२.२ मिमी तर एकूण १११ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तहसील आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page