कोल्हापुर येथील सैनिक पॅटर्नवर आधारित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु…

केवळ शाळाच नव्हे तर ज्ञान शिस्त आणि संस्कार देणारे घरा नंतरचे घर म्हणून शाळेची ओळख…

⚡सावंतवाडी ता.११-: सैनिक घडवणाऱ्या कोल्हापूर शिरोळ येथील चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.इयत्ता चौथी ते बारावी (कला) पर्यत मराठी आणि सेमी इंग्रजी चे शिक्षण देणारी शाळा म्हणून संपुर्ण कोल्हापुर जिल्ह्यात नावलौकिक केले आहे. केवळ शाळा नव्हे तर ज्ञान शिस्त आणि संस्कार देणारे घरा नंतरचे घर म्हणून शाळेची ओळख आहे.

चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने स्थापनेपासून आजपर्यंत शंभर टक्के निकाल राखण्यात यश मिळवले आहेत, सैनिकी पॅर्टनच्या धर्तीवर याठिकाणी संस्कार दिले जाते. त्यामुळे या ठिकाणी शेकडो राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यास हातभार लागतो आजपर्यंत अनेक खेळाडू या संस्थेने तयार केले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात अब्दुललाट येथे ही निवासी शाळा असून यावर्षीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.या निवासी शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास नाश्ता भोजन शिक्षण खेळ प्रशिक्षण योगा मेडिटेशन ध्यान संगीत नृत्य घोडेस्वारी रायफल शूटिंग स्पर्धा परीक्षेची तयारी आणि अनेक ऍक्टिव्हिटीज या शाळेच्या माध्यमातून दिले जातात त्यामुळे प्रकारे सैनिकी घडवणारी शाळाच म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. त्यामुळे सैनिक होण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाल्याने आजच आपला प्रवेश नोंदवावा असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे प्रवेशासाठी ९८९०१०१९१९/९६२३५५५५७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page