बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक अँड.परिमल नाईक यांच्याकडून शुभेच्छा
सावंतवाडी ता 11:
बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंद, तसेच पालक वर्गाचे माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच भावी शैक्षणिक पर्व हे तीव्र स्पर्धात्मक युग असल्यामुळे कठोर परिश्रम व एकाग्रतेची सांगड घालून विद्यार्थ्यांनी धैर्याने स्पर्धेत उतरले पाहिजे तरुणाईने स्पर्धात्मक परीक्षा देऊन सनदी अधिकारी होण्याचं उद्धीष्ठ उराशी बाळगलं पाहिजे व त्याच बरोबर केवळ नोकरीच्या मागे न लागता आवडीनुसार व्यवसायिक शिक्षण सुद्धा घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याच स्वप्न बाळगलं पाहिजे असा सल्ला त्यांनी भावी पिढीला दिला आहे
